आज दि तीन नोव्हेबर रोजी दुपारी चार वाजता माहिती देण्यात आली कि खुलताबाद तालुक्यातील पिंपळगाव येथे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मक्का, सोयाबीन आणि वेचणीला आलेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी कृती समितीच्या वतीने सरकारने जाहीर केलेली मदत तात्काळ देण्यात यावी, तसेच विहीर व गायगोठ्यांच्या प्रलंबित फाईली मंजूर कराव्यात, अशी मागणी शेतकरी नेते महेश गुजर यांनी केली.