रामटेक: रामटेक तालुक्यासह शहरातील सर्व शाळांत 'प्रवेशोत्सव' उत्साहात साजरा
Ramtek, Nagpur | Jun 30, 2026 रामटेक तहसील व शहरातील शाळातील विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या संपताच मंगळवार दिनांक 30 जून पासून शाळा पुन्हा पूर्ववत सुरू झाल्याआहेत. शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांतर्फे उत्साहात स्वागत करुन शासन निर्देशानुसार प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.