मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी मौजे वेणी येथे भेट देऊन येथील परम् पूज्य संत श्री आश्रूबाबा महाराज सेवाश्रम वेणी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथे श्री संत आश्रूबाबा महाराज व लिंबेश्वर महाराज यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलशारोहन कार्यक्रम आयोजित केला होता या सोहळ्याची सांगता प्रसंगी आमदार सिद्धार्थ खरात यांची विशेष उपस्थिती लावली. या वेळी परम पूज्य श्री १००८ स्वामी हरी चैतन्यानंद सरस्वती महाराज पळसखेड यांची श्रीमद् भागवत कथा आयोजित करण्यात आली होती. या कथेची सांगता करण्यात आली या शेवट्याच्या दिवशी या वेळी आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांनी श्री संत आश्रूबाबा महाराज व भागवत कथाकार व परम पूज्य श्री १००८ स्वामी हरी चैतन्यानंद सरस्वती महाराज पळसखेड यांचे काल्याचे कीर्तन प्रसंगी उपस्थित राहून दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.