नरखेड: येनवा येथे 'महाराजस्व समाधान शिबीर' उत्साहात संपन्न; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Narkhed, Nagpur | Apr 17, 2026 येनवा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना आणि सेवा नागरिकांच्या दारी पोहोचवण्यात आल्या.याप्रसंगी उपविभागीय अधिकारी पियुश चिवंडे, समन्वय समितीचे अध्यक्ष दिनेश ठाकरे, माजी जि.प. सदस्य समीर उमप, तहसीलदार सौ. बोरकर, तालुका कृषी अधिकारी कौटकर आणि नायब तहसीलदार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.