समुद्रपूर: खेक गावाजवळील भिवकुंड पाटीजवळ नाल्याच्या बाजूला आढळला झुनका येथिल ३३ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह
खेक गावा जवळील भिवकुंड पाटी जवळ १५ जुलै रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास नाल्याच्या बाजूला झुनका येथिल ३३ वर्षीय इसमाचा मृत्यदेह आढळल्याची माहिती आज १६ जुलै रोजी पोलिसांकडून प्राप्त झाली असून मृत्यक इसमाचे नाव विठ्ठल वटे वय ३३ वर्ष असे आहे मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठल वटे यांची करोना मध्ये तब्येत बिघडल्याने डोक्यात फरक पडला होता व काही दिवसानी त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मृत्यक विठ्ठल वटे हे कोरा बाजारात जाते म्हणुन घरून गेले होते.