समुद्रपूर: गिरड परिसरात वाघाचे वास्तव्य असल्याने नागरिकांनी सर्तक राहण्याचे वनविभागाचे आवाहन, २ पथके वाघाच्या मार्गावर
खुर्सापार जंगलातून शेतशिवारात भटकंती करीत निघालेल्या वाघाने एकाच शिवारात मुक्काम ठोकला आहे.त्यामुळे उंदीरगाव अंतरगाव भवानपुरर परिसरातील गावात दहशत पसरलेली आहे.९ जुलैच्या मध्यरात्री उंदीरगावात गोठ्यात शिरकाव करून एका गोऱ्याला ठार केल्यावर सतत दोन दिवस वाघाने शिकार खाऊन मुक्काम ठोकला रविवारी अंतरगाव व सावंगी आणि वडगाव येथे वाघ असल्याचे निदर्शनास आले आहे तर सर्व सांभाळुन राहावे असे आवाहन रविवारी सायंकाळी ५ वाजता वनविभागाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.