समुद्रपूर: गिरड सोनामाता देवस्थान परीसरात श्री स्वामी समर्थ सेवक मंडळाच्या वतीने औदुंबराच्या वृक्षाचे पूजन करून वृक्षाची केली लागवड
गिरड येथील गुरुदेव सेवा मंडळ व निर्सग प्रेमींच्या पुढाकाराने घरोघरी गावात मिशन १० हजार वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येत असून याच अनुषंगाने सोनामाता देवस्थान परीसरात श्री स्वामी समर्थ सेवक मंडळाच्या वतीने १६ जुलै रोजी ११ वाजता औदुंबराच्या वृक्षाचे पूजन करून वृक्षाची लागवड करण्यात आली यावेळी उपस्थित महिलांनी वृक्ष संवर्धनाबाबत संकल्प घेण्यात आला वृक्ष लागवडी करिता वैशालीताई ठक , वैशालीताई गाठे,नंदिनीताई टिपले नीलिमाताई दाते, अर्चनाताई बारवकर, आदी उपस्थित होत्या.