समुद्रपूर: गिरड येथे मगन संग्रहालय समिती आणि वनविभाग कार्यालयाच्या वतीने काढण्यात आली वृक्ष दिंडी, झाडे लावा झाडे जगवाचा दिला संदेश
गिरड येथील मगन संग्रहालय समिती व वनविभाग कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने गिरड व परीसरातील गावांमध्ये १ लाख वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येत असून आज सोमवारी ११ वाजता या मोहिमेअंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.या वृक्ष दिंडीत विकास विद्यालय गिरड, जिल्हा परिषद शाळा मुलांची व मुलीची गिरड, गुरुकुल विद्या निकेतन गिरड,बालपांडे पब्लिक स्कूल गिरड येथील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.