जालना: रेल्वे प्रवाशांचे खिसेकापू संशयिताला ताब्यात घेतले; जालना रेल्वे स्थानकावरील घटना; रेल्वेकडून विशेष कारवाई
Jalna, Jalna | Sep 8, 2026 ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत प्रवाशांच्या सामानाची चोरी करणार्यांवरही पाळत ठेवण्यात आली असून रेल्वे प्रवाशांचे खिसे कापणार्या एका संशयीताला जालना रेल्वे स्थानकावुरन ताब्यात घेण्यात आले. गुन्हे गुप्तवार्ता शाखा, नांदेड आणि विशेष पथकाने वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त व सहायक सुरक्षा आयुक्त यांच्या देखरेखीखाली ही कारवाई केली. मंगळवार दि. 8 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 17663 नगरसूल-काचीगुडा रेल्वेमध्ये प्रवाशांच्या वस्तू चोरल्या होत्या.