रामटेक: जंतर मंतर दिल्ली आंदोलनाच्या यशस्वीतेनंतर रामटेक येथे निघाली तिरंगा रॅली
Ramtek, Nagpur | Jul 27, 2026 जंतर-मंतर नवी दिल्ली येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर रामटेक येथे सोमवार दिनांक 27 जुलैला सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान तिरंगा रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर बस स्टँड चौक रामटेक येथून निघालेल्या या तिरंगा रॅलीचे नेतृत्व जंतर-मंतर दिल्ली येथे जाऊन प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या राहुल कोठेकर यांनी केले.