रामटेक: चिचाळा येथील कल्याणी मोहारे हिने सलग दुसऱ्यांदा पटकाविला विदर्भ केसरी पुरस्कार
Ramtek, Nagpur | Apr 20, 2026 अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे संपन्न 38 व्या विदर्भ केसरी स्पर्धेत न्यू पवनसुत तालीम संघ चिचाळा येथील कुस्तीपटू कल्याणी मोहारे हिने सलग दुसऱ्यांदा विदर्भ केसरीचा बहुमान पटकाविला. सोमवार दिनांक 20 एप्रिलला नगरधन व चिचाळा येथे तिचे भव्य स्वागत करण्यात आले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार नवनीत राणा सहित अतिथींच्या हस्ते तिला पुरस्कार देण्यात आला.