कल्याण पश्चिम येथील काळा तलावात उडी मारून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर परिसरातील सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत.
या घटनेनंतर काळा तलाव परिसरात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे अनेक दिवसांपासून बंद असल्याचा आरोप समोर आला आहे. तसेच, घटना घडली त्यावेळी सुरक्षा रक्षक नेमके कुठे होते, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. परिसरातील अनेक पथदिवेही बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.
Kalyan, Thane | Jul 28, 2026