नरखेड: अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या दोघांवर पोलिसांची कारवाई
Narkhed, Nagpur | Apr 15, 2026 सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या दोन इसमांविरुद्ध नरखेड पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.गस्ती दरम्यान उदयभान संतोष देहारे याला खरसोली शिवारात, तर संजय जाणबाजी कुंभरे याला माणिकवाडा गोंडेगाव रोड शिवारात चिलमीद्वारे अमली पदार्थांचे सेवन करताना रंगेहात पकडण्यात आले. दोन्ही आरोपी हे बानोर येथील रहिवासी असून त्यांच्यावर कलम २७ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.