आरोग्य विभागाचा मोठा निर्णय: आरोग्य कर्मचाऱ्यांचे होणार 'स्किल लॅब' प्रशिक्षण!
1.7k views | Gondia, Maharashtra | Aug 21, 2026 आरोग्य विभागाचा मोठा निर्णय: आरोग्य कर्मचाऱ्यांचे होणार 'स्किल लॅब' प्रशिक्षण! मुंबई: राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी आरोग्य विभागाने नवीन प्रशिक्षण धोरण लागू केले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी ही माहिती दिली. धोरणातील महत्त्वाच्या गोष्टी: कौशल्य प्रयोगशाळा (Skill Lab): कर्मचाऱ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच २० दिवस स्किल लॅब आणि ८ दिवस जिल्हा रुग्णालयात प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण अनिवार्य: नवीन नियुक्ती, पदोन्नती आणि सेवा कालावधीनुसार सर्व नियमित व कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक असेल. एकछत्री नियंत्रण: राज्यातील सर्व प्रशिक्षण संस्था नागपूरच्या सार्वजनिक आरोग्य सेवा प्रशिक्षण संचालनालयाच्या नियंत्रणाखाली येतील. ५ वर्षांचा आराखडा: प्रत्येक पदाच्या गरजेनुसार ५ वर्षांचा विशेष प्रशिक्षण प्लॅन तयार केला जाणार आहे. दर्जेदार आरोग्य सेवेद्वारे नागरिकांचा शासकीय आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास वाढवणे, हा या धोरणाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले.