रामटेक: जराई मराई माता मंदिर रामटेक परिसरात पशुचा गोठा आगीत स्वाहा
Ramtek, Nagpur | May 6, 2026 मंगळवार दिनांक पाच मे च्या रात्री साडेबारा वाजता च्या दरम्यान रामटेक येथील टेलिफोन एक्सचेंजच्या मागील जराही मराई माता मंदिर रामटेक परिसरातील अमोल तुरक रा. राजाजी वार्ड,रामटेक यांच्या मालकीच्या पशुच्या गोठ्याला अचानक आग लागली. नगरपरिषदच्या अग्निशमन दलाच्या वाहनाने येऊन आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत चारा, कुटार, तणस सह कृषी साहित्य जळून खाक झाले.