अंबरनाथ: बदलापूरमध्ये बहुजन-आंबेडकरी चळवळीचा न्यायासाठी मोर्चा
बदलापूरमध्ये एका बौद्ध युवकाला बेदम मारहाण झाली असून, पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी उलट मार खाल्लेल्या युवकावरच खोटा गुन्हा दाखल केला आहे, असा आरोप बहुजन आणि आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष-संघटनांनी केला आहे. या अन्यायकारक कारवाईच्या निषेधार्थ सर्व पक्ष-संघटनांनी एकत्र येत आज दिनांक 27 एप्रिल रोजी दुपारी 12 च्या सुमारास बदलापूरमध्ये न्यायासाठी मोर्चा काढला.