रामटेक: सराखा बोरडा येथे अंगार मुक्त अभियान अंतर्गत वनविभागाची जनजागृती मोहीम
Ramtek, Nagpur | Apr 10, 2026 पेंच व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत वनविभागाकडून अंगार मुक्त अभियान राबवत वणवा रोखण्यासाठी आणि मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या अनुषंगाने गुरुवार दिनांक 10 एप्रिलला सकाळी बोरडा येथे उपसंचालक अक्षय गजभिये, सहायक वनसंरक्षक कु. पूजा लिंबगावकर, वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे तसेच क्षेत्र सहाय्यक सचिन ताकसांडे आणि गणेश खंडाईत यांच्या मार्गदर्शनाखाली चोरबावली उपवन क्षेत्रात विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.