गंगापूर: वाळूज येथे महिलांना ट्रॅक्टर, पिंक ऑटो व कर्ज वितरण सोहळा संपन्न
आज मंगळवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी माहिती देण्यात आली की गंगापूर तालुक्यातील वाळूज येथे ग्रामपंचायत व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (तालुका अभियान कक्ष गंगापूर), स्वरदर्शन संस्था आणि ग्रामोदव प्रकल्प वाळूज यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वाळूज प्रभागातील महिला व स्वयं-सहायता समूह बचतगट यांना ट्रॅक्टर, पिंक ऑटो तसेच कर्ज वितरण करण्यात आले.एकूण ₹2 कोटी 20 लाखांचा निधी लाभार्थ्यांमध्ये वितरित केले.