रामटेक: शितलवाडी येथे 28 वर्षीय युवा अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या
Ramtek, Nagpur | Jul 2, 2026 जि प नागपूर जलजीवन उपविभाग रामटेक येथे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत 28 वर्षीय एका अविवाहित अधिकाऱ्याने शितलवाडी येथील किरायाच्या घरात राहत असताना गुरुवार दिनांक 2 जुलै ला सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. मृतकाचे नाव सौरभ पवार वय 28 वर्षे राहणार मनोज हांडे यांची घरी किरायाने गजानन महाराज मंदिर जवळ शीतलवाडी असे आहे.