धुळे: नकाणे गावात पोळा सण उत्साहात साजरा; पोळा फोडण्यात प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या बैल मालकांचा करण्यात आला सन्मान
Dhule, Dhule | Sep 2, 2024 नकाने येथे वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरेनुसार बैलपोळा सण साजरा झाला आहे, पोळ्याच्या पर्शवभूमीवर शेतकर्यांनी आपापल्या बैलांची आकर्षक सजावट करून गावातील सर्व मंदिरांभोवती प्रदक्षिणा घातल्या, त्यानंतर गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर असलेल्या वेशीवरून सर्व बैलांचा गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या हस्ते झेंडा दाखवून पोळा फोडण्यात आला, गावाच्या प्रवेशद्वारात प्रथम येणाऱ्या बैलास वर्षभराचा मानाचा बैल मानला जाण्याची परंपरा आहे.