धुळे: नेर गाव परिसरात दारुच्या नशेत विषारी औषध प्राशन केल्याने ८१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू, धुळे तालुका पोलीस ठाण्यात नोंद
Dhule, Dhule | Sep 2, 2024 धुळे तालुक्यातील नेर येथील रहिवासी दगडु हरचंद सोनवणे वय 81यांनी दारूच्या नशेत काहीतरी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाला. दगडु हरचंद सोनवणे यांना विषारी औषध प्राशन केल्यानंतर अचानक तब्येत बिघडली आणि त्यांना तातकाळ धुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बोरसे करीत आहेत.