धुळे: इंदोर मनमाड रेल्वे मार्ग निधी मंजूर होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देवपूर परिसरात फटाके फोडून केला जल्लोषसाजरा
Dhule, Dhule | Sep 2, 2024 केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान इंदोर मनमाड रेल्वे महामार्गासाठी निधी मंजूर करण्यात आल्यानंतर धुळ्यात देवपूर परिसरात असलेल्या खासदार शुभ बच्छाव यांच्या कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे, व या निधीस मंजूर करण्यासाठी नवनिर्वाचित खासदार शोभाताई बच्छाव यांनीच केंद्रात दबाव आणल्यामुळे अखेर मंजुरी मिळत निधी देण्यात आला असल्याची भावना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख महेश मिस्त्री यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.