नागपूर ग्रामीण: शेतकऱ्यांचा शेतमाल घेऊन लाखोंची फसवणूक; वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शेतकरी उत्पादक कंपनी आणि इतर दलालांकडून तांदूळ, तूर व चणा असा शेतमाल उकळून ठरलेली रक्कम न देता एकूण ८३,१३,०१२ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी सचिन सुरेशराव सोमनकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मेसर्स वरुण एंटरप्रायजेस, वाडीचा मालक आरोपी सुदर्शन हयग्रीव राव यांनी कंपनीचा आणि इतर दलालांचा शेतमाल खरेदी केला होता.