कळमेश्वर: अनोळखी मृतदेहाची पटली ओळख, सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे यांची धाव
दिनांक 20 मे रोजी बुधवारला काटोल नागपूर रोडवरील एका पानांच्या बाजूला एक अनोळखी मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे नेण्यात आला मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत होता मृतदेहाची ओळख पटलेली असून रमेश शामराव पचारे वय 75 वर्ष राहणार सेलू गोराड वर्धा असे आहे सदर इसम हा 12 मे रोजी लापता झालेले होते खूप शोधाशोध करूनही मिळालेले नाही सदर व्यक्तीचा मृतदेह पोलीस स्टेशन कळमेश्वर हद्दीत आढळून आला