कळमेश्वर: तेल कामठी येथे दिवाणी व फौजदारी न्यायालय कळमेश्वर तर्फे भव्य वृक्षरोपण सोहळ्याचे आयोजन, विद्यार्थ्यां तर्फे वृक्षदिंडी
कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी येथे दिवाणी व फौजदारी न्यायालय कळमेश्वर तर्फे भव्य वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन आज रविवार दिनांक 06 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पासून करण्यात आले यावेळी स्थानिक शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढून सर्व गावात झाडे लावा झाडे जगवा हा विचार व्यक्त केला. हा कार्यक्रम दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश माननीय राठोड सर व मांडवे सर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला