रामटेक: थरारक : मनसर - माहुली मार्गावरील पेंच नहरात कार कोसळली; सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही
Ramtek, Nagpur | May 30, 2026 रामटेक जवळील मनसर - माहुली मार्गावर असलेल्या पेंच नहरावरील पुलाखाली एक अनियंत्रित कार नहरात कोसळली. सुदैवाने यावेळी नहर वाहत नव्हता. ही घटना शनिवार दिनांक 30 मे ला दुपारी एक वाजता च्या दरम्यान घडली. या अपघातात कारमधील दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.