सिकलसेल मुक्त समाजासाठी अर्जुनी मोरगावात 'अरुणोदय'चा एल्गार!
महिला मेळाव्यात आरोग्य विभागाची व्यापक जनजागृती; जिल्हा परिषद अध्यक्षांच्या उपस्थितीत अभियानाचा जागर
259 views | Arjuni Morgaon, Gondia | Feb 10, 2026 अर्जुनी मोरगाव (दि. १० फेब्रुवारी): महिलांचे आरोग्य आणि सक्षम समाज घडवण्याच्या उद्देशाने आज अर्जुनी मोरगाव येथे आयोजित तालुकास्तरीय महिला मेळाव्यात 'सिकलसेल अॅनिमिया' निर्मूलनाचा संकल्प करण्यात आला. महिला व बालविकास विभाग आणि पंचायत समितीच्या वतीने आयोजित या सोहळ्यात आरोग्य विभागाच्या 'अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया अभियाना'ची अत्यंत प्रभावी पद्धतीने जनजागृती करण्यात आली.