रामटेक: पवनी (देवलापार ) परिसरात रुग्णवाहिका महामार्गाच्या कडेला उतरली
Ramtek, Nagpur | Jun 3, 2026 देवलापार पोलीस स्टेशन क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील अवनी परिसरातील चिंधाई माता मंदिर जवळ नागपूरकडून जबलपूर कडे जाणारी एक रुग्णवाहिका क्रमांक एम एच 04 जे के 8240 ही अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गाच्या कडेला उतरली ही घटना बुधवार दिनांक 3 जूनला सायंकाळी साडेपाच वाजता च्या दरम्यान घडल्याची माहिती आहे. यात कुठलीही हताहत झालेली नाही.