यंदा बाप्पाकडे एकच मागणं – आरोग्यसंपन्न महाराष्ट्र! : प्रकाश आबिटकर
783 views | Nanded, Maharashtra | Sep 14, 2026 गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. "महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आरोग्य, सुख, समाधान आणि समृद्धी नांदो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह प्रत्येक कुटुंब निरोगी राहावे, 'आरोग्य हीच खरी संपत्ती' हा विचार घेऊन प्रत्येकाने आपले गाव आरोग्यसंपन्न करावे," असे आवाहन त्यांनी या संदेशाद्वारे केले आहे. #Kolhapur #PublicApp #PrakashAbitkar #Ganeshotsav #MaharashtraHealth