हिंगणघाट: सुभाष चौकात ताफा थांबवुन शिवसेना उबाठा पक्षाचे अमृत योजनेच्या कामाची चौकशीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन
हिंगणघाट शहरात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याकरीता आले असता त्यांचा ताफा सुभाष चौकातून जात असतांना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांचा ताफा थांबवून हिंगणघाट नगरपरिषदद्वारा अमृत योजने अंतर्गत भूमिगत गटार योजना,तथा नवीन पिण्याचे पाण्याची १२ टाकी, तसेच संपूर्ण शहरात नळ पाईपलाईन बसविण्याचे कामाची सखोल चौकशी शासनामार्फत करावी अशा आशियाचे निवेदन दिले.निवेदन देतेवेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते