ब्रह्मपुरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी ब्रह्मपुरी शहर निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले. उत्साहपूर्ण आणि उर्जायुक्त वातावरणात झालेल्या या सोहळ्याला उपस्थित राहताना मनस्वी आनंद झाला. या कार्यालयातून निवडणूक नियोजन, संघटन आणि जनसंपर्काला नवी दिशा व गती मिळेल. नागरिकांच्या अपेक्षा आणि विकासाचा आराखडा यांचा संगम घडवत, हे कार्यालय आगामी निवडणूक मोहिमेचे मुख्य केंद्र ठरेल.