चंद्रपूर: प्रियदर्शिनी सभागृह येथे धरती आबा जनभागीदारी अभियानाचा पालकमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ
आदिवासी बांधवांना ग्रामस्तरावरच योजनांचा लाभ तसेच विविध प्रमाणपत्र उपलब्ध व्हावे, हा मुख्य उद्देश ठेवून चंद्रपूर मध्येही हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत या अभियानाचा लाभ पोहोचविण्यासाठी लोकचळवळ म्हणून काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरद्वारे प्रियदर्शिनी सभागृह येथे आज दि 5 जुलै ला 12 वाजता धरती आबा जनभागीदारी अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.