रामटेक: वनविभाग रामटेकने सुरू केला वाहिटोला येथील सोशल मीडियावर व्हायरल ' त्या ' बिबट चा शोध
Ramtek, Nagpur | Jul 3, 2026 मागील ३० जूनच्या रात्री वाहिटोला येथे भाजपा उपाध्यक्ष उदयसिंह उर्फ गज्जू यादव यांच्या घरासमोरील तसेच मनसर माईन्स च्या ओल्ड डम्पिंगच्या सुरक्षा भिंतीजवळ एक बिबट जवळच असलेल्या पशुंच्या गोठ्याजवळ उभा राहून पशुंना शिकारीसाठी गुरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तसेच वर्तमानपत्रातील बातम्यांद्वारे व्हायरल झाला. त्यानंतर मागील दोन ते तीन दिवसांपासून रामटेक वनविभागाने याची दखल घेत त्या बिबट चा शोध सुरू केला आहे.