सेलू: हिंगणी-बोरधरण रोडवर बुलेट दुचाकी झाडावर आदळून दुचाकी चालकाचा मृत्यू, हिंगणी शिवारात घडली घटना
Seloo, Wardha | Nov 27, 2024 भरधाव येणाऱ्या दुचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडाला धडकून चालकाचा मृत्यू झाला. ही घटना ता. 27 बुधवारी दुपारी 1 ते 1.30 वाजताच्या सुमारास बोरधरण रोडवर हिंगणी शिवारात घडली. आशिष सुरेश दुधबडे वय 25 रा. शिवनगाव असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. असे सेलू पोलिसांकडून सांगण्यात आले.