सेलू: कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत साई गोल्ड जिनिंगमध्ये सीसीआय मार्फत आधारभूत किमतीने कापूस खरेदीचा शुभारंभ
Seloo, Wardha | Nov 27, 2024 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शासनाच्या आधारभूत किमतीने साई गोल्ड जिनिंगमध्ये सीसीआय मार्फत कापूस खरेदीचा शुभारंभ आज ता. 27 बुधवारला दुपारी 12.30 वाजता करण्यात आला. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशरीचंद खंगारे सचिव महेंद्र भांडारकर यांच्यासह संचालक व सीसीआयचे अधिकारी उपस्थित होते.