सेनगाव: धनगरवाडी परिसरात तुर पिकावरील मर रोगाने शेतकरी चिंतेत,कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी
सेनगांव तालुक्यातील धनगरवाडी परिसरामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे तुर पिकावर मोठ्या प्रमाणात मर रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तात्काळ मर रोग रोखण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी आज दिनांक 1 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता करण्यात आली आहे.अगोदरच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत असताना त्यातच तूर पिकावर देखील मर रोगाने थैमान घातल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.