समुद्रपूर: कोरा खापरी रस्त्यावर धावत्या चारचाकीने घेतला पेट, जीवितहानी नाही
समुद्रपुर तालुक्यातील कोरा खापरी रस्त्यावर शुक्रवारी ११ वाजताच्या सुमारास अचानक कृझर गाडीने पेट घेतला यावेळी चालकाने प्रसंगावधान राखून गाडीत असलेल्या प्रवाशांना त्वरित गाडीबाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण करून कुझर गाडीची राख रांगोळी केली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हि आग शाॅर्ट सर्कीट मुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.