रामटेक: उमरी (जुनेवानी )येथील शेतात विद्युत करंटने अस्वलाचा मृत्यू : प्रेत गड्ड्यात पुरले ;3 आरोपी अटकेत
Ramtek, Nagpur | May 23, 2026 वनपरिक्षेत्र देवलापार प्रादेशिक अंतर्गत शेत सर्वे क्रमांक १० मौजा उमरी येथे आरोपी जयदेव रायसिंग सलामे रा. उमरी (जुनेवाणी) यांचे शेतात गुप्त माहितीवरून वनाधिकाऱ्यांनी शोध घेतला असता शेताला असलेल्या तारेतून विद्युत करंट मुळे एका अस्वलाचा मृत्यू झाल्याचे कळले. त्याचे शव शेतकऱ्यांनी जमिनीत पुरले. या माहितीवरून तीन आरोपींना अटक करण्यात आली.