रामटेक: पंचाळा येथे कोंबडी - कबुतराच्या खुराड्यात सर्पमित्राने पकडला 6 लांबीचा नाग
Ramtek, Nagpur | Jul 8, 2026 रामटेक नजीकच्या पंचाळा गावातील सरगम पंजरे यांच्या शेतातील घरात असलेल्या कोंबडी व कबुतराच्या टिनाच्या शेडमध्ये मंगळवार दिनांक 7 जुलैला रात्री 8.30 वाजताच्या दरम्यान कोंबड्यांचा कलकलाट ऐकून सरगम हे खुराड्याकडे गेले. येथे त्यांना खुराड्यातच एक सहा फुटी गव्हाळ्या नाग दडून बसल्याचे दिसले. रामटेक येथील सर्पमित्र सागर धावडे यांना त्यांनी बोलावले. सागर धावडे यांनी मोठ्या कौशल्याने सुरक्षितपणे त्या नागाला पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात जंगलात नेऊन सोडले.