भाजप नगरसेवक मंदार टावरे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त केला बीएलओ शिक्षकांचा सन्मान
SIR मोहीम यशस्वीपणे राबवण्यासाठी शिक्षक दिवसरात्र मेहनत घेत असल्याने गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांचे आभार मानत सन्मान करत दिली भेटवस्तू
डोंबिवली - भाजप नगरसेवक मंदार टावरे यांच्यावतीने
गुरु पौर्णिमेनिमित्त अनोखा उपक्रम राबवण्यात आला. शिक्षक आणि शिक्षकांना SIR मोहिमेचे कामकाज राबवण्यासाठी बीएलओ पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आपले दैनंदिन कामकाज सांभाळून हे शिक्षक आणि शिक्षक SIR मोहीम राबवण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेत आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून भाजपा नगरसेवक मंदार टावरे यांनी डोंबिवली पूर्वेकडील आयरेगाव येथे SIR मोहिमेचे यशस्वीपणे कामकाज राबविणाऱ्या यादी
भाग क्र. ९१ ते १०१ मधील सर्व बीएलओ (शिक्षक-शिक्षिका) यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त सत्कार करून त्यांना
सन्मानचिन्ह व भेटवस्तू देत सन्मान केला .
Kalyan, Thane | Jul 29, 2026