नागपूर ग्रामीण: मानकापूर येथे अतिक्रमण काढत असलेल्या प्लॉट धारकालाच केली मारहाण
पोलीस स्टेशन मानकापूर हद्दीत लोहकरे लेआउट येथे संजय भोसले यांचा प्लॉट आहे ते दोन मजूर घेऊन प्लॉटची साफसफाई करत होते आणि प्लॉटवर केलेले कंपाउंड चे अतिक्रमण काढत असताना आरोपी सिमरन यांनी त्यांचे पती रोहन संकुलवार यांना फोन करून बोलविले. दरम्यान रोहनने लोखंडी सळाखिने मारहाण करून संजय भोसले यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून आरोपी विरुद्ध मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे