रोहा: अनिकेत तटकरेंच्या जागेवर राजन साळवींना शिवसेना उभे करणार
Roha, Raigad | May 25, 2026 ज्या पक्षाचा 2022 ला आमदार होता त्याच पक्षाला ती जागा देण्याचा फॉर्म्यूला महायुतीत ठरला असला तरी अनिकेत तटकरे यांच्या जागी राजन साळवींना उभे करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याने कोकण मतदार सघांत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी लढत होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरझालेल्या बैठकीत एकूण 17 जागांपैकी शिवसनेला 3, राष्ट्रवादीला 2 तर भाजपाला 12 जागा देण्याबाबत चर्चा झाली आहे. मात्र राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या कोकण मतदार संघावरही शिसेनेने दावा केला आहे.