अमरावती: शहरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त ३ एसआरपीएफ प्लाटूनसह १८०० पोलीस राहणार बंदोबस्तासाठी तैनात
महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरात 6 डिसेंबर रोजी पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार असून तीन एसआरपीएफ प्लाटूनसह एकूण 1800 पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात राहणार आहे, अशी माहिती 5 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता प्राप्त झाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस शुक्रवारी सहा डिसेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त शहरात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस विभागाने नियोजन केले आहे.