नाशिक: जय भवानी रोड येथे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी महिलेची वीस लाखांची फसवणूक; तिघांवर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Nashik, Nashik | Jan 9, 2026 रेल्वे सेवानिवृत्त महिलेच्या खात्यातून परस्पर वीस लाखांची रक्कम काढून घेऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली असून तिघांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रमिला रमेश महिना वय 65 या रेल्वे सेवानिवृत्त कर्मचारी असून आरोपी कृष्णा राजेश चंडालिया, राजेश श्यामलाल चंडालिया आणि सागर राजेश चंडालिया यांनी संगणमत करून फिर्यादी यांचा विश्वास संपादन वेळोवेळी फिर्यादी यांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढून फसवणूक केली.