अमरावती: प्रहार पदाधिकाऱ्यांची पोलीस आयुक्त कार्यालयात डीसीपींसोबत बैठक, चर्चेअंती १६ डिसेंबरचे राहुटी व लोटांगण आंदोलन स्थगित
पुनर्वसन बाधित गावातील नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधांच्या मागणीसाठी प्रहारच्या वतीने सोमवारी 16 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर राहूटी आणि लोटांगण आंदोलन करण्यात येणार होते. मात्र रविवारी 15 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात डीसीपी गणेश शिंदे, इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित बैठक घेऊन चर्चा अंति आंदोलन स्थगित करण्यात आले. बैठकीला प्रहारचे जिल्हाध्यक्ष वसु महाराज तसेच महानगर प्रमुख बंटी रामटेके आदि उपस्थित होते.