रोहा: किल्ले रायगडावरील ५४ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा कार्यान्वित
Roha, Raigad | Jun 19, 2026 छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या रायगड किल्ला येथील सुरक्षेच्या दृष्टीने एक दिलासादायक घडामोड घडली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सुमारे ५४ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहेत. ६ जून रोजी झालेल्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कार्यवाही करण्यात आल्याने शिवभक्तांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.