रत्नागिरी : महाआरोग्य सन्मान 2026 सोहळ्यात रत्नागिरीतील डॉ. सुप्रीम कांबळे व आशा स्वयंसेविका ईश्वरी जाधव यांचा राज्यस्तरीय गौरव..
179 views | Ratnagiri, Maharashtra | Feb 24, 2026 रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तळवली, तालुका गुहागर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रीम कुमार प्रकाश कांबळे यांना “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार” तर तालुका मंडणगड अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कुंबळे उपकेंद्र म्हाप्रळ येथील आशा स्वयंसेविका श्रीम. ईश्वरी जाधव यांना “महाआरोग्य सन्मान – 2026” प्रदान करण्यात आला. हा सन्मान आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते देण्यात आला.याबद्दल जिल्हा परिषद प्रशासन व जिल्हा आरोग्य विभागाकडून त्यांचे व टीम चे अभिनंदन करण्यात येत आहे.