🚨 ऑपरेशन थंडर 2.0 🚨
मा. डॉ. रवींद्रकुमार सिंघल, पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन थंडर 2.0 अंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मानकापूर पोलीस ठाण्याच्या वतीने म्हाडा कॉलोनी, गोधनी रेल्वे येथील शिवमंदिर समोरील मैदानात व्यापक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यादरम्यान युवक, पालक आणि नागरिकांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नशेमुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणाऱ्या घातक परिणामांची माहिती देत, नशामुक्त जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.
यावेळी NDPS कायद्यातील तरतुदी, अमली पदार्थांची विक्री, सेवन, साठवणूक व वाहतूक हे गंभीर गुन्हे असल्याची माहिती देण्यात आली. तसेच अमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ Dial 112 वर संपर्क सा�
Nagpur, Maharashtra | Jun 22, 2026