नरखेड: नरखेड पोलीस स्टेशन येथे 71 आरोपींची घेण्यात आली परेड
Narkhed, Nagpur | Jun 20, 2026 , तालुक्यात शांतता राहावी यासाठी नरखेड पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली आज 71 आरोपींची परेड घेण्यात आली. यामध्ये आरोपींना समज देण्यात आली असून शहरात शांतता नांदावी यासाठी सक्त ताकीद देण्यात आली. या आरोपींमध्ये अवैध धंदे करणारे तसेच इतर आरोपींचा देखील समावेश होता