मुंडगाव वणी वारुळा येथील फाट्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या परतवाडा,अकोला,अकोट आगारातील अकोट अकोला मार्गावर धावणाऱ्या सर्व एस टी बसेसना थांबा असुन सुद्धा या फाट्यावर परतवाडा, अकोला, अकोट आगारातील परतवाडा धावणाऱ्या बसेसचे चालक व वाहक येथील टिकिट न फाडता देवरी फाटा अथवा अकोटचे टिकिट फाडून सुद्धा बस थांबवत नाही व प्रवाशांना वणी वारुळा फाट्यावर उतरुन न देता देवरी फाटा अकोटला उतरून दिल्या जाते.अकोट आगारातील बस क्र.एम एच ४० एक्यु 6467 च्या चालकाविरुद्ध तक्रर देण्यात आली आहे.